गणपतीपुळे चाफे मुख्य मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या एकाचा मृत्यू


रत्नागिरी तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणपतीपुळे ते चाफे मुख्य मार्गावर असलेल्या महालक्ष्मी हॉल समोर एका अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत रत्नागिरीतील वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल शनिवार दि. २८ मार्च रोजी सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडली. राजेश मधुकर साळवी (वय ५६ वर्षे, मूळ रा. फणसोप रत्नागिरी सध्या रा. रामरोड गणपतीपुळे) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत जयगड पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, राजेश मधुकर साळवी हे चाफे ते गणपतीपुळे मार्गावर वॉकिंगकरिता जात असताना सकाळी सव्वासात ते साडेसातच्या सुमारास या मार्गावरून जाणार्‍या एका अज्ञात वाहन चालकाने त्यांना ठोकर दिल्याने ते जागच्या जागी कोसळले. यावेळी आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी ही घटना पाहिली असता तत्काळ सदर दिशेने धाव घेऊन अज्ञात वाहनाच्या धडकेत खाली पडलेल्या राजेश साळवी यांना बडतोब मालगुंड येथील प्राथमिक आरोय केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले. परंतु येथील आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍याने त्यांची तपासणी केली असता त्यांना मृत घोषित केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button