खेड शहरातील विकासकामांबाबत उद्या महाविकास व वंचित आघाडीची मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा !

खेड : – शहरातील विकासकामांबाबत उद्या सोमवार दि. २३ मार्च रोजी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती महाविकास व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
शहरात ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासह अन्य कामे संथ गतीने सुरु आहेत. त्यातच धुळीचा त्रास लहान मुलांपासून ते वयोवृद्धांना, व्यापारी वर्गाला होत आहे. याबाबत येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांची भेट घेऊन सुरु असलेल्या कामाबाबत चर्चा करणार असून, धुळीपासुन सुटका करण्याचा आणि कामांना वेगाने चालना मिळुन लवकरात लवकर कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे असे चंद्रशेखर पाटणे, बशीर मुजावर, प्रणव महापुस्कर, किरण तायडे, अनिल सदरे, यांनी सांगितले आहे . याबाबतचे निवेदन महाविकास व वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने नगरपरिषदेला दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button