खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्टीयल केमिकल कंपनीच्या स्फोटातील जखमी दोन कामगारांचाही मृत्यू


खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील डॉ. खान इंडस्टीयल केमिकल कंपनीत रिऍक्टरचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या सुजल दास (२९, रा. आवाशी), असद खान (४४, रा. घाणेखुंट) या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या ३ वर पोहोचली आहे.
गेल्या ३० वर्षांपासून लोटे औद्योगिक वसाहतीत कार्यान्वित असलेल्या डॉ. खान इंडस्ट्रीयल कंपनीत इथॉईल सिलिकेट हे रसायन बनवण्याचे काम केले जाते. ६ मार्च रोजी रिऍक्टरचा स्फोट होऊन ११ कामगार होरपळले होते. यातील सुजल दास, असद खान, नंदकिशोर कृष्णा राणे, रणजीत राणे, रघुनाथ खामकर या ५ गंभीर जखमींवर ऐरोली-मुंबई येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. याठिकाणी उपचार सुरू असतानाच चौथ्या दिवशी रघुनाथ बंडू खामकर (रा. मुरडे-शिंदेवाडी, खेड) या कामगाराचा मृत्यू झाला होता. त्यानंतर उपचार सुरू असतानाच सुजल दास, असद खान यांचाही मृत्यू झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button