
खेड तालुक्यातील निळीक मोहल्ला येथील भाजावळीत भाजलेल्या वृद्धाचा मृत्यू
खेड तालुक्यातील निळीक मोहल्ला येथील बशीर महमूद चौगुले (६५) यांचा खलाटीच्या शेतातील भाजावळीच्या आगीत भाजून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. पोलस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शेतात भाजावळ करताना बशीर यांना उन्हामुळे चक्कर आली. ते भाजावळीत पडून गंभीर भाजले. उपचारासाठी त्यांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
www.konkantoday.com




