खेड तालुक्यातील आंबडस हायस्कूल येथे शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर


रत्नागिरी, ) : खेड तालुक्यातील आंबडस हायस्कूल, आंबडस येथे दि. 27 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला, विद्यार्थ्यांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली पाटील यांनी केले आहे.
महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नाचे निराकरण करणेव जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर अशा शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button