
खेडमधील चाटव आणि लवेल या दोन गावात मनाई आदेश
खेड : तालुक्यात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू असतानाच काही गावातील उत्सव मात्र वादामध्ये अडकले आहेत. खेडमधील चाटव आणि लवेल या दोन्ही गावातील शिमगाउत्सवावर तहसील कार्यालयाकडून मनाई आदेश लावण्यात आले आहेत.
होळीनंतर गावातील देवांच्या पालख्या गाव भेटीसाठी बाहेर पडत असतात. मात्र गावातील वाद आणि मानापमान यामुळे सालाबादप्रमाणे याही वर्षी सुसेरी, धवडे, शिरगाव, लवेल, वडगांव, चाटव या गावत निर्माण झालेल्या वादादीत परिस्थितीमध्ये तहसील प्रशासन पोलीस यांच्यामध्ये झालेल्या चर्चेतून ४ गावातील वाद आपापसात मिटवून शिमगाउत्सव साजरा केला जात आहे. मात्र चाटव आणि लवेल येथील वाद न मिटल्याने तहसीलदार कार्यालयाने दोन्ही गावात १६३ प्रमाणे मनाई आदेश लागू केला आहे.




