
, खालील बातमीस आपल्या लोकप्रिय नियतकालिकात छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी, ही नम्र विनंती.
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात मुस्लिम संस्थांनी अनधिकृतपणे लावलेले धार्मिक फलक प्रशासनाने काढले
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या निवेदनाचा परिणाम
रत्नागिरी, १ मार्च - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतींवर काही दिवसांपूर्वी मुस्लिम संस्थांकडून अनधिकृतपणे लावलेले धार्मिक फलक हिंदु राष्ट्र समन्वय समितीने या संदर्भात दिलेल्या निवेदनाची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने तात्काळ काढून टाकले आहेत. फलक काढल्याचे लेखी पत्रही रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातर्फे हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालय (रत्नागिरी )च्या परिसरात व इमारतींच्या भिंतींवर 'इफ्तारी का इंतिजाम', 'सेहरी का इंतजाम किया जाएगा', अशा आशयाचे फलक यंग मेमन वेल्फेअर फाउंडेशन आणि अरमान ग्रुप, रत्नागिरी या मुस्लिम संस्थांनी संपर्क क्रमांकांसहित काही दिवसांपूर्वी लावले होते. शासकीय नियमांनुसार आणि भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांनुसार कोणत्याही शासकीय कार्यालयात किंवा रुग्णालय परिसरात एखाद्या विशिष्ट धर्माचा प्रचार करणारे किंवा धार्मिक उपक्रमाचे फलक लावण्यास मनाई आहे, ही बाब हिंदु राष्ट्र समन्वय समितीने जिल्हा शासकीय रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली होती. हे फलक तात्काळ काढून टाकावेत आणि ते लावणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही समितीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी तात्काळ हे फलक काढून टाकण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनास दिले आणि ते फलक काढून टाकण्यात आले. शासकीय जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना 'पुन्हा असे फलक लावून देऊ नयेत आणि हे पुनश्च घडू नये, याची दक्षता घेण्याबाबत कडक निर्देश देण्यात आले असल्याचे' लेखी पत्र रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल श्री. संतोष सावंत यांनी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. प्रभाकर खानविलकर यांना दिले आहे.आपला नम्र,
श्री. संजय जोशी,
हिंदु राष्ट्र समन्वय समिती, रत्नागिरी
संपर्क : 8983265759




