
खराब हवामानाचा फटका बागायतदारांसह खिशालाही, हापूसच्या पेटीचा दर १२ हजारांवर
गुढीपाडव्याच्या दिवशी कोकणच्या हापूसची मोठी प्रतीक्षा असते. मात्र १९ मार्च वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूसची आवक कमालीची घटली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी पेट्या बाजारात दाखल झाल्याने हापूसचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. खराब हवामानाचा फटका बागायतदारांसह खिशालाही बसला आहे.
गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वाशी मार्केटमध्ये तब्बल ४० हजार आंबा पेट्यांची रेलचेल होती. मात्र यंदा हे चित्र पूर्णपणे बदलले असून केवळ १३ हजार ९२५ पेट्याच दाखल झाल्या आहेत. आवक घटल्याने हापूसच्या पेटीचा दर ५ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
www.konkantoday.com



