
कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू, राज्याला मोठा दिलासा
राज्यात वाढत्या उन्हामुळे विजेची मागणी झपाट्याने वाढत असताना महाराष्ट्राच्या ऊर्जा व्यवस्थेचा कणा मानला जाणारा कोयना जलविद्युत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहे. राज्याला विजेची टंचाई होऊ नये, यासाठी मागणीच्या प्रमाणात प्रकल्पातून सातत्याने वीजनिर्मिती केली जात असून, राज्याला मोठा दिलासा मिळत आहे.
सुरुवातीला वीजनिर्मितीसाठी निर्माण केलेला हा प्रकल्प सिंचन व वीजनिर्मितीसाठी उपयुक्त ठरत असून, १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेल्या या धरणात ६६.८३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांपर्यंत अर्थात यापर्यंत राज्यासाठी दिलासादायक आहे.
www.konkantoday.com




