
कोकणातील नुकसान झालेल्या आंबा, काजू बागायतदारांना हेक्टरी २२ हजारांची मदत
गेल्या काही दिवसांत झालेल्या अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अत्यंत सकारात्मक पाऊल उचलले असून, फळ पीक विमा न उतरवलेल्या शेतकर्यांनाही आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शविली आहे. मुख्यमंत्री यांनी विधानसभेत यासंदर्भात सविस्तर माहिती देत पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याचे जाहीर केले.
नुकसानीचा प्राथमिक अहवाल आणि बैठक आंबा व काजू पिकाच्या सद्यस्थितीबाबत १७ मार्च रोजी पहिली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सादर करण्यात आलेल्या प्राथमिक अहवालानुसार, प्रतिकूल हवामानामुळे यंदा फळधारणा अत्यंत कमी झाली असून शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील सुमारे ८० हजार शेतकर्यांनी आंबा पिकासाठी विमा उतरवला आहे.
www.konkantoday.com




