
कॉंग्रेस पक्ष ’लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात
कॉंग्रेसने लक्ष्मी लोटेतील ऑरगॅनिक कंपनीच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यासंदर्भातील प्रश्न कॉंग्रेसचे आमदार अधिवेशनात मांडतील. लोटे ठिकाणी सुरु असलेल्या आंदोलनास आमचा पाठिंबा आहे. कुठल्याही परिस्थितीत हा उद्योग सुरु राहू नये ही कॉंग्रेसची मुख्य मागणी आहे. इटलीमध्ये बंद होणारी कंपनी कोकणात येते असेल तर हा कोकणात सोबत केलेला धोका आहे. याविषयी कोकणातील आमदार, मंत्री गप्प का असा प्रश्न कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत विचारला आहे.
युती, आघाडी आणि तडजोडीचे सुरु असलेल्या राजकारणामुळे याचा कॉंग्रेसला फटका बसत आहे. अशातूनही मार्ग काढून कॉंग्रेसला कोकणात पूर्वीसारखेच गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे ते म्हणाले.
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकानंतर कॉंग्रेसच्या चिन्हावर लढलेल्या उमेदवारांना अधिक सक्षम करण्यासाठी येथे तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्याची सांगता रविवारी झाली ज्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, तळागाळापर्यंत कॉंग्रेस वाढविण्यासाठी संघटन बांधणीवर विशेष भर दिला जात असून त्यातून निश्चिपणे कॉंग्रेस पक्ष अधिकाधिक बळकट होईल, गेली २०-३० वर्षामध्ये राज्यात युती, आघाडी आणि तडजोडीचे राजकारण सुरु आहे. याचा कॉंग्रेसला फटका बसत आहे. अशातूनही मार्ग काढून भविष्यात कॉंग्रेसला बळकटी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.www.konkantoday.com




