कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे१९ मार्चला हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

रत्नागिरी : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गुढीपाडवा अर्थात चैत्र शुद्ध प्रतिपदा, १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता ही यात्रा उत्साहात काढण्यात येणार आहे.

ही स्वागत यात्रा सिद्धिविनायक मंदिर, गणेशनगर (कुवारबाव) येथून प्रारंभ होणार आहे. पुढे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) समोरील काजरघाटी धारेवरून सुपलवाडी – गोडाऊन स्टॉप – नवलाई मंदिर मार्गे मार्गक्रमण करत ‘श्रीमान यशवंत हरी गोखले भवन’ येथे येऊन यात्रेची सांगता होणार आहे. हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित या यात्रेत सभासद, महिला, युवक तसेच कुटुंबियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या यात्रेत सहभागी होताना दुचाकी, तिनचाकी तसेच चारचाकी वाहनांसह सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो. या निमित्ताने समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन नववर्षाचे स्वागत करावे आणि समाजात एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत व्हावा, या उद्देशाने ही स्वागत यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमाला समाजातील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button