
कारमध्ये बेशूध्द अवस्थेत सापडून आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी शहरानजीकच्या एकदंतनगर जाणाऱ्या फाट्याजवळ कारमध्ये बेशूध्द अवस्थेत सापडून आलेल्या प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.ही घटना सोमवार 2 मार्च रोजी दुपारी 12.30 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात घडली.
वैभव जयप्रकाश सावंतदेसाई (43,रा.नवेदरवाडी खेडशी,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. याबाबत खबर देणार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार, सोमवारी दुपारी एकदंतनगर फाट्याजवळ इर्टिगा कार (एमएच-08-एएन-8904) उभी होती. तसेच कारला बाष्प पकडले होते. खबर देणार यांनी कारमध्ये पाहिले असता त्यांना कारमध्ये ड्रायव्हरसिट मागे घेउन वैभ्ाव सावंतदेसाई झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे खबर देणार यांनी त्याठिकाणी जमलेल्या इतर लोकांच्या मदतीने गाडीची काच फोडून दरवाजा उघडला असता वैभव सावंतदेसाईची कोणतीच हालचाल दिसून येत नव्हती. तसेच त्यांच्या तोंडातून फेस आलेला होता. खबर देणार यांनी त्याच कारमधून वैभवला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.




