कांचन डिजिटल आयोजित पहिल्यावहिल्या “मराठमोळी दुचाकीस्वार” स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद!

🔸पाचजणींना “मराठमोळी दुचाकीस्वार” ‘किताब आणि मानाची पैठणी प्रदान

🔸 फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांच्या संकल्पनेतून आगळीवेगळी स्पर्धा
🔸मुकेश गुंदेचा यांच्यातर्फे मानाच्या पैठण्या

रत्नागिरी :- हिंदू नववर्ष स्वागतयात्रेत आकर्षक मराठमोळी वेशभूषा परिधान करून दिमाखात दुचाकीवर स्वार झालेल्या पाचजणींनी “मराठमोळी दुचाकीस्वार” ‘हा किताब पटकवला. रत्नागिरीतील प्रसिद्ध “कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ”तर्फे यंदा अशी पहिलीवहिली स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते हा किताब प्रदान करण्यात आला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही या स्पर्धेचे कौतुक केले.

रत्नागिरीत गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाच्या शुभारंभ दिनी काल 19 मार्च रोजी सकाळी 9 वाजता भव्य स्वरूपात निघालेल्या हिंदू नववर्षं शोभायात्रेतून तज्ज्ञ परीक्षकांनी पाच जणींची “मराठमोळी दुचाकीस्वार” या किताबासाठी निवड केली.

यात सर्वप्रथम राजेश्वरी इंगवले यांची ह्या किताबसाठी निवड करण्यात आली. त्यांना नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते हा किताब प्रदान करण्यात आला. त्यानंतर संध्या कोसुबकर यांची ह्या किताबसाठी निवड करण्यात आली. त्यांना श्रावणी मालगुंडकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर त्यानंतर अनुक्रमे राधा देवळे या किताब विजेत्यांना सौ. भारती जैन यांच्या हस्ते, राजश्री बंडबे या किताब विजेत्यांना सौ. स्नेहा विरकर यांच्या हस्ते, तर निकिता निवेंडकर या किताब विजेत्यांना सौ. दीपिका कुबल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

प्रतिवर्षीप्रमाणे श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदूकेश्वर संस्था आणि श्री पतीतपावन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येते. “कांचन डिजिटल फोटो स्टुडिओ”चे प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर हे प्रतिवर्षी या हिंदू नववर्ष स्वागतयात्रेदरम्यान एक आगळीवेगळी संकल्पना घेऊन येतात. यंदा “मराठमोळी दुचाकीस्वार” ही अशीच अनोखी स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. “मराठमोळी दुचाकीस्वार” ह्या 5 विजेत्यांना अरिहंत ग्रुपचे मुकेश गुंदेचा यांजकडून मानाची पैठणी देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी श्री देव भैरी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, नाना मराठे , कांचन डिजिटल चे कांचन मालगुंडकर, मंथन मालगुंडकर, विश्वस्त विजय खेडेकर, नगरसेविका वर्षा ढेकणे, सुप्रिया रसाळ, राजेश आयरे, दादा दळी, सायली बेर्डे, शैलेश बेर्डे, कौस्तुभ सावंत, राजेश आयरे, नंदू चव्हाण, अनिल पोटफोडे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button