ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण इरादा पत्रास स्थगिती


*रत्नागिरी, दि. 11 :- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 9 मार्च रोजी झालेल्या बैठकीमध्ये ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्याच्या खुले धोरणास स्थगिती देण्याबाबत निर्देश देण्यात आले. परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इरादापत्र देण्याच्या कामास स्थगिती देण्यात येत आहे, याची जिल्ह्यातील नागरिकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाला राज्यातील विविध संघटनाकडून ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांचे खुले धोरण बंद करण्याबाबत सातत्याने विनंती करण्यात येत होती. या अनुषंगाने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवार दि. 9 मार्च रोजी बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ऑटो रिक्षा टॅक्सी परवान्याच्या खुले धोरणास स्थगिती देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन मंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील इरादापत्र देण्याच्या कामास स्थगित देण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या बदलाची नोंद घ्यावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button