
एप्रिलकरिता अंत्योदय कार्ड धारकांसाठी तालुकानिहाय धान्य साठ्याचे वितरण
रत्नागिरी, दि. 11 ) :- माहे एप्रिल 2026 करिता जिल्ह्यातील 38 हजार 535 अंत्योदय कार्ड धारक सदस्यांकरिता अंत्योदय तांदूळ 702.50 मे.टन व गहू 529 मे.टन नियतनाची भारतीय अन्न महामंडळ पनवेल यांच्याकडून प्राधान्यची उचल कराण्यात आली आहे. माहे एप्रिल 2026 करिता तालुकानिहाय धान्य साठ्याचे वितरण करण्यात आल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत यानी कळविले आहे.
माहे एप्रिल 2026 करिता मंडणगड तालुक्यात 1550 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 27.50 मे.टन तांदूळ तर 22 मे.टन गहू , दापोली तालुक्यात 3194 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 53.50 मे.टन तांदूळ तर 40 मे.टन गहू , खेड तालुक्यात 3867 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 74 मे.टन तांदूळ तर 56 मे.टन गहू, गुहागर तालुक्यात 3272 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 64.50 मे.टन तांदूळ तर 48 मे.टन गहू, चिपळूण तालुक्यात 5835 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 107 मे.टन तांदूळ तर 81 मे.टन गहू, संगमेश्वर तालुक्यात 7091 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 139 मे.टन तांदूळ तर 106.25 मे.टन गहू, रत्नागिरी तालुक्यात 4385 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 85 मे.टन तांदूळ तर 63.25 मे.टन गहू, लांजा तालुक्यात 3462 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 69 मे.टन तांदूळ तर 51 मे.टन गहू, राजापूर तालुक्यात 4234 अंत्योदय कुटुंब लाभार्थ्यांसाठी 83 मे.टन तांदूळ तर 61.50 मे.टन गहू चे वितरण करण्यात आले आहे.
माहे एप्रिल साठी अंत्योदय कुटुंबातील लाभार्थ्यांकरिता धान्याचे वितरण प्रति कार्ड 35 किलो प्रमाणात करावयाचे असून त्यामध्ये अंत्योदय तांदूळ 20 किलो व गहू 15 किलो असे असेल.




