उड्डाण होताच हेलिकॉप्टरमधून धूर आला; उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्यांच्या हेलिकॉप्टरचे लखनऊमध्ये इमर्जन्सी लँडिंग!

: उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावी लागली. ते लखनऊहून कौशांबीला जात होते. दरम्यान, ते आता दुसऱ्या हेलिकॉप्टरने कौशांबीला रवाना झाले आहेत.

‘उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लखनऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ते लखनौमधील ला मार्टिनियर ग्राउंडवरून कौशांबीला प्रवास करत असताना ही समस्या उद्भवली’, असं वृत्त IANS या वृत्तसंस्थेने दिले आहे. मौर्य, त्यांचा सहाय्यक विवेक आणि दोन वैमानिकांसह पाच जणांसह हेलिकॉप्टर लखनऊला मार्टिनियर कॉलेज ग्राउंड हेलिपॅडवरून उड्डाण करत असताना त्यात बिघाड झाला

उड्डाणानंतर लगेचच हेलिकॉप्टरमध्ये धूर दिसला. त्यामुळे वैमानिकांना लखनऊ विमानतळावर आपत्कालीन लँडिंगचा पर्याय निवडावा लागला’, असं एका भाजप नेत्याने सांगितले असल्याचे वृत्त एबीपी न्यूजने दिले. दरम्यान, धूर का निर्माण झाला आणि पायलटला आपत्कालीन लँडिंग करण्यास भाग पाडले याची कारणे शोधण्यासाठी तज्ञांची एक टीम तातडीने दाखल झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button