
आर्थिक विकास होत असताना पर्यावरण संरक्षण म्हत्वाचे: डॉ. केतन चौधरी
विज्ञान दिन निमित्ताने सुरुवातीला विद्यापीठ स्तर स्पर्धेसाठी निवडलेले महाविद्यालयातील विद्यार्थी अविष्कार संशोधन प्रकल्प सादरीकरण करण्यात आले होता. सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि मत्स्य अभियांत्रिकी तंत्रीनिकेतन रात्नागीरीचे प्राचार्य डॉ केतन चौधरी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ चौधरी यांनी शास्त्र, संशोधन म्हणजे काय, डॉ सी व्ही रामन यांचे शोध कार्य या बद्दल माहिती दिली. शाश्वत विकास आणि पर्यावरण संरक्षण या विषयावर बोलताना त्यांनी शाश्वत विकास आणि त्याची उद्दिष्टे स्पष्ट केली. देश झपाट्याने आर्थिक विकासाकडे मार्गक्रमण करीत असताना पर्यावरणीय शाश्वतता महत्वाची असून, समृद्ध पर्यावरण आणि आनंदी जनता ही शाश्वत विकासातून प्राप्त होईल असे प्रतिपादन केले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, सायन्स असोशिएशन समन्वयक, प्रा. रॉड्रिग्ज, डॉ एम. एन जांभळे व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्याची ओळख प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ एन पी कांबळे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे आयोजन सायन्स असोशिएशन मार्फत करण्यात आले.



