आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘माहेर’ संस्थेतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप


​रत्नागिरी
रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार आणि कुडाळ-मालवणचे लोकप्रिय आमदार माननीय निलेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत एका स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ‘माहेर’ या सामाजिक संस्थेला भेट देऊन तेथील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
​हा सामाजिक उपक्रम दुर्गेश पिलणकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. निलेश राणे साहेबांचा वाढदिवस केवळ शुभेच्छा देऊन साजरा न करता, तो समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवून साजरा करावा, या भावनेतून हा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत त्यांना वह्या आणि इतर शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
​या प्रसंगी निलेश राणे मित्र मंडळाचे अमोल देसाई, निखिल शेटये, अमृत गोरे, श्रीनाथ सावंत, नरेश बनसोडे, सोम पिलणकर, ध्रुव घोसाळे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिशय उत्साही आणि मंगलमय वातावरणात हा वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला. आमदार निलेश राणे यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button