आबलोली येथे “खेळ पैठणीचा” उत्साहात आणि जल्लोषात संपन्न

सौ. श्रावणी पागडे पैठणीची प्रथम, तर सौ.वृषाली पालशेतकर द्वितीय मानकरी

आबलोली : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील श्री नवलाई देवी मंदिर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली होती. तसेच जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य (विभाग रत्नागिरी, केंद्र गुहागर) या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नीलेश भगवान सांबरे यांच्या ५० व्या जन्मदिनानिमित्ताने आबलोली येथे महिलांसाठी खास “खेळ पैठणीचा” या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
“खेळ पैठणीचा”मध्ये आबलोली गावातील शेकडो महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. शेवटी अटीतटीच्या खेळात सौ. श्रावणी अनिकेत पागडे या पैठणीची प्रथम मानकरी ठरल्या, तर सौ. वृषाली राकेश पालशेतकर या द्वितीय मानकरी ठरली. या दोघींनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक पैठणी प्रदान करण्यात आल्या.
“खेळ पैठणीचा” या खेळामध्ये महिलांसाठी खास अनेक खेळ ठेवले होते. यामध्ये महिलांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे अतिशय चांगले नियोजन आणि निवेदन रत्नागिरी जिजाऊ संस्थेचे पाली विभाग सदस्य साहिल गोरे यांनी केले. कार्यक्रमापूर्वी जिजाऊ संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी ही या कार्यक्रमाला भेट देऊन महिलांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर जिजाऊ संस्थेचे गुहागर तालुका समन्वयक आणि ॲड. प्रसाद जांगळे, आबलोली गावचे खोत सचिन कारेकर, प्रमोद गोणबरे, ॲड. प्रमेय आर्यमाने यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सहभागी महिलांनाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गावचे प्रमुख यशवंत पागडे, गावकर अनंत पागडे, दिनेश शिंदे,अनंत जानू पागडे, कृष्णा उकार्डे, कृष्णा पालशेतकर, पोलीस पाटील महेश भाटकर,निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी नेटके, सदस्या सौ. पायल गोणबरे, सौ. शैला पालशेतकर, श्रीमती नम्रता निमुणकर, माजी सभापती सौ. पूर्वी निमुणकर, सीआरपी सौ. मीनल कदम, सौ. वेदिका पालशेतकर, अंगणवाडी सेविका श्रद्धा भाटकर आदी बहुसंख्य महिलांनी सहभाग नोंदवला होता. शेवटी ॲड. प्रमेय आर्यमाने यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आबलोलीच्या ग्रामस्थांचे तसेच जिजाऊ संस्थेचे गुहागर तालुका समन्वयक ओमकार तीवरेकर आणि ॲड. प्रसाद जांगळे तसेच साहिल गोरे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button