
अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांचा राजीनामा? NCP उद्याच घेणार निर्णय; तातडीने बोलावली बैठक
राज्यात सध्या कॅप्टन अशोक खरात प्रकरण गाजत असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत येताना दिसत आहेत.रुपाली चाकणकरांचे अशोक खरात यांच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामुळे विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे हे प्रकऱण रुपाली चाकणकर यांना भोवण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भोंदूबाबा खरात प्रकरण रुपाली चाकणकर यांना भोवणार असं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस रूपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याची शक्यताही आहे. उद्या यासंदर्भात राष्ट्रवादीने काँग्रेसची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. रुपाली चाकणकर यांच्या संदर्भात उद्याच फैसला होऊ शकतो. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि इतर महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.




