अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अधिनियम 1989 दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील वारसास नियुक्तीपालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते किशोर खोपकरांना नियुक्तीपत्र


रत्नागिरी, दि. 22 ) : अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार अनुसूचित जाती व जमातीच्या ज्या व्यक्तीचा खून झाला आहे त्या व्यक्तींच्या वारसांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचा निर्णय आहे. तथापि सरळसेवेच्या शासन निर्णयात याबाबत स्पष्ट आदेश नसल्यामुळे बऱ्याच नियुक्ती रखडल्या होत्या. एकूण 960 केसेस मध्ये अद्याप नोकरी देणे प्रलंबित होतो या सर्वाचा विशेष आढावा घेऊन शासनाने या केसेस मधील पात्र व्यक्तींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार सामाजिक न्याय विभागात नियुक्ती देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्त एकूण 98 जणांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील किशोर खोपकर यांच्या भावाचा खून झालेला होता. ते पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते किशोर खोपकर यांना चिपळूण येथील शासकीय मुलांचे वस्तीग्रह येथे पहारेकरी या पदावर नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त दीपक घाटे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button