
अधिकारी उपलब्ध नसल्याने कामगार योजनांचा रत्नागिरीत बोजवारा
रत्नागिरी जिल्ह्यातील बांधकाम कामगारांसाठी राबविण्यात येणार्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात रखडल्याने कामगारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अर्ज मंजूर करणारा संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे
अनेक लाभधारकांचे अर्ज अनेक महिने प्रलंबित राहिले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष नारायणराव खोराटे यांनी सहाय्यक आयुक्त संदेश आयरे यांची भेट घेऊन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. या वेळी त्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत कामगारांना वेळेवर लाभ मिळत नसल्याची तक्रार केली.
खोराटे यांनी सांगितले की, गेल्या वर्षभरापासून गरोदर महिला कामगारांना मिळणारा आर्थिक लाभबंद पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाईन अर्ज सादर अ करूनही मंजुरी मिळण्यासाठी सहा ’ ते आठ महिने लागतात. या काळात एखाद्या कामगाराचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कामगारांच्या मुलांना मिळणार्या शिष्यवृत्ती वेळेत मिळत नसल्याने शिक्षणात अडथळे निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com




