
अखेर ट्रम्प यांचे एक पाऊल मागे; इराणवरील हल्ले तूर्त टळले
पश्चिम आशियातील युद्धाच्या झळा संपूर्ण जगाला बसू लागल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक पाऊल मागे येण्याचा निर्णय घेतला आहे.होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या मुदतीत पाच दिवसांची वाढ करतानाच या कालावधीत इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर आणि अणू केंद्रांवर कोणतेही हल्ले न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी स्वत:च्या मालकीच्या ‘ट्रूथ सोशल’ या समाजमाध्यमाद्वारे ही घोषणा केली




