0 ते 18 वयोगटातील संशयित हृदयरोग मुलांकरिता प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी टू डी इको जिल्हा रुग्णालयात तपासणी


रत्नागिरी, दि. 24 ) :-जिल्हा रुग्णालय रत्नागिरी सोनोग्राफ्री सेंटर मध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शानिवारी 12 ते 4 वाजता या वेळेमध्ये मुंबई येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या डॉ. पूजा सिन्हा (कन्सल्टंट पेडीॲट्रीक कार्डीओलॉजिस्ट) यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील संशयित हृदयरोग मुलांच्या टू डी इको तपासणीकरीता उपस्थित राहणार आहेत. तरी या तपासणीचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीमधून पुढील उपचारांची गरज असणाऱ्या मुलांकरिता कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण व उपजिल्हा स्तरावर तसेच जिल्हा स्तरावर विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा गरजू लोकांपर्यंत पोहचवणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हृदयरोग संशयित दोषी आढळणा-या मुलांकरिता जिल्हा रुग्णालय येथे 2 डी इको तपासणी शिबिराचे आयोजन वर्षातून 2 वेळा केले जाते. तरी यापुढे 2 डि इको तपासणीकरिता मुलांना व पालकांना जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही यासाठी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी सोनोग्राफ्री सेंटर मध्ये प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शानिवारी 12 ते 4 वाजता या वेळेत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button