हातखंबा जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवारी भरल्यानेपरशुराम कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी


हातखंबा जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष उमेदवारी भरल्याने व
पक्ष विरोधात काम करत असल्याने परशुराम कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करत असल्याचे जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे यामुळे गेले अनेक महिने शिवसेना सोबत असलेल्या पदाधिकाऱ्याची हकालपट्टी झाल्याने खळ बळ उडाली आहे.

माजी जिल्हा परिषद सभापती असलेले परशुराम कदम हे शिंदे शिवसेनेत युवा सेना कोकण विस्तारक या पदावर होते.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा प्रमुख राहुल पंडित यांनी म्हटले आहे की
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ मध्ये रत्नागिरी तालुक्यातील ३५ हातखंबा जिल्हा परिषद गटातील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री. सुयोग नंदकुमार कांबळे यांच्या विरोधात श्री. परशुराम मारुती कदम, युवा सेना कोकण विस्तारक हे अपक्ष उभ राहून निवडणूक लढवित असून शिवसेना पक्ष संघटना विरोधात निवडणूकीत काम करत आहेत.

सदरबाब लक्षात घेता श्री. परशुराम कदम यांची त्यांना दिलेल्या पदावरून आणि शिवसेना पक्षातून हाकलपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद गटात आता कोण विजयश्री खेचणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button