स्वामी स्वरूपानंदचा संमिश्र व्यवसाय ७०० कोटी – ॲड.दीपक पटवर्धन


स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने आपल्या व्यवहारात कमालीचे सातत्य राखत ठेवी व कर्ज यांचा संमिश्र व्यवसाय ७०० कोटी पल्याड नेला आहे.
आज अखेर संस्थेच्या ठेवी ४०१ कोटी २२ लाख झाल्या असून संस्थेची कर्ज २९८ कोटी ८६ लाख ८ हजार झाली आहेत. अशा प्रकारे ७०० कोटींचा संमिश्र व्यवसाय संस्थेने पूर्ण केला आहे. ४९ हजार सभासदांच्या सहकार्याने स्वरूपानंद पतसंस्थेने ७०० कोटींचा व्यवसाय अत्यंत शिस्तबद्ध, प्रमाणबद्ध पद्धतीने विश्वासार्हता जपत पूर्ण केला.
या संपूर्ण प्रवासात ३०० सभासद त्यांचे १० हजाराचे भांडवल यावर प्रारंभ करत आज ४९ हजार सभासद १७ ब्रँचेस संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्षेत्र असा आपला विस्तार केला आहे.
१६९ कोटींच्या बँक गुंतवणुका, ५२ कोटींचा भक्कम स्वनिधी, ९९.७०% टक्के कर्ज वसुली, 0 % नेट NPA, सातत्याने “अ” ऑडीट वर्ग, २८ % भांडवल पर्याप्तता, १० कोटींच्या घरात पोचलेला निव्वळ नफा अशी भक्कम आर्थिक स्थिती ठेवत गेली ३४ वर्ष सहकार तत्व आणि व्यवसायिकता यांचा सुरेख संगम करून स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने सातत्यपूर्ण उत्तम रिझल्ट देत आपले अर्थकारण गतिमान ठेवले आहे. आर्थिक शिस्त, विश्वासार्हता, पारदर्शकता, उत्तम ग्राहक सेवा ही संस्थेने आपली ब्रीद म्हणून स्विकारली असून ही तत्व आपल्या व्यवस्थेमध्ये संस्कार म्हणून बिंबवली आहेत.
७०० कोटींचा संमिश्र व्यवसाय ही एक आर्थिक अॅचिव्हमेंट आहे. संस्थेने हा इष्टांक पूर्ण केला. आता ध्येय १००० कोटींकडे आहे. सर्व प्रवासात सभासद ग्राहकांने दिलेले सहकार्य अनमोल होते. कर्मचारी वर्गाचे योगदान मिळाले यामुळेच हा प्रवास हा टप्पा गाठता आला असे भावोद्गार ॲड.दीपक पटवर्धन यांनी काढले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button