सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरीअध्यक्षपदी केदार करंबेळकर

रत्नागिरी : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या २०२६-२७ या वर्षाच्या कार्यकारिणीची निवड आज करण्यात आली. यामध्ये सीए केदार करंबेळकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

इन्स्टिट्यूटच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. यामध्ये नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. सीए करंबेळकर यांच्या सोबत उपाध्यक्षपदी सीए अक्षय जोशी, सचिवपदी सीए नचिकेत जोशी, खजिनदार म्हणून सीए शरदचंद्र वझे, विद्यार्थी समितीचे अध्यक्ष सीए अनुप शहा यांची निवड झाली. मावळते अध्यक्ष सीए मंदार जोशी यांनी नवीन कार्यकारिणीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सीए बिपीन शहा व सीए प्रसाद आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सीए इन्स्टिट्यूटची रत्नागिरी शाखा गेली १०-११ वर्षे कार्यरत असून दर महिन्याला सदस्यांकरिता मार्गदर्शकांची व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्र, सीए दिनानिमित्त सामाजिक उपक्रम व अनेकविध कार्यक्रम आयोजित केले जातात. यापुढेही नवनवीन कार्यक्रम राबवण्याचा मानस सीए केदार करंबेळकर यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button