सिंधुदुर्ग मालवणच्या समुद्रात पोलिसांच्या ‘नेपोलियन’ गस्तीनौकेला जलसमाधी;नौकेवरील दोघा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश!


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रात शनिवारी दुपारी एक खळबळजनक घटना घडली. सोसाट्याचा वारा आणि समुद्रातील अजस्त्र लाटांच्या धडकेमुळे पोलिसांच्या ‘नेपोलियन’ नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली. ही दुर्घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस घडली. सुदैवाने, नौकेवरील पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेपोलियन ही गस्तीनौका सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पाठीमागील बाजूस (सुमारे १० वाव अंतर) गस्त घालत होती. सध्या समुद्रामध्ये सोसाट्याचा वारा वाहत असून लाटांचा जोर प्रचंड आहे. दुपारी साडेबाराच्या सुमारास अचानक आलेल्या मोठ्या लाटांनी नौकेला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे नौकेत पाणी शिरले आणि ती बुडू लागली. नौकेवरील पोलीस कर्मचारी आणि खलाशी यांनी तातडीने खबरदारी घेत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.
घटनेची माहिती मिळताच मालवणचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तात्काळ योगेश तोडणकर यांची नौका घेऊन समुद्रात धाव घेतली. त्यांच्यासोबत मत्स्य व्यावसायिक विली डिसोजा, नॉवेल फर्नांडिस, होमगार्ड जॉयल फर्नांडिस आणि खलाशी रॉनी, कुमार, लॉरेन्स, बेंडिट यांनीही मदतीसाठी धाव घेतली.
स्थानिक मच्छिमार आणि पोलिसांनी बुडणाऱ्या नौकेला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, लाटांचा जोर अधिक असल्याने नौका वाचवण्यात यश आले नाही. या बचाव मोहिमेत बुडणाऱ्या नौकेवरील दोघा जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले असून, नौकेवरील सर्व जण सुखरूप किनाऱ्यावर पोहोचले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button