
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या कार्यालय आगीत भस्म सात
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) कार्यालयाला सोमवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली.आगीच्या भडक्यात संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले.
आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठया प्रमाणात भडकलेल्या आगीवार नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. घटनेची माहिती मिळताच मालवण नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शर्तीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आगीत एमटीडीसी कार्यालयातील संगणक, फर्निचर, कागदपत्रे तसेच अन्य कार्यालयीन यंत्रणा जळून खाक झाल्या. आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हे कार्यालय लाकडी बोटीच्या प्रतिकृतीच्या स्वरुपात उभारण्यात आले होते. लाकडी बांधकाम असल्यामुळे सर्व जळून गेले. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे




