सिंधुदुर्गच्या विकासासाठी ६०० कोटींचा आराखडा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर


सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा ६०० कोटींच्या पुढे नेल्याबद्दल आमदार नीलेश राणे यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडलाया वाढीव निधीमुळे जिल्ह्याच्या विकासकामांना मोठी गती मिळणार असून, प्रशासनाने आता वेगाने कामाला लागावे, असे निर्देश यावेळी देण्यात आले.

​या प्रस्तावाला उत्तर देताना पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की, “खासदार नारायण राणे यांच्या विकासाच्या संकल्पना डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करत आहोत. जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.​सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांना जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा मिळणे आवश्यक आहे. “पर्यटन वाढले तरच प्रत्येकाच्या हाताला काम मिळेल. स्थानिकांना सेवा क्षेत्रांतून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांगीण सुविधा देण्यावर आमचा भर राहील,” असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button