
सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनीमुंबई ते विजयदुर्ग ही बहुप्रतिक्षित एम२एम कंपनीच्या बोटीचे पहिले तिकीट बुक करून या सेवेचा शुभारंभ केला,१ मार्चपासून सुरूवात
मुंबई ते विजयदुर्ग ही बहुप्रतिक्षित बोटसेवा अखेर १ मार्चपासून सुरू होत आहे. या सेवेमुळे केवळ प्रवाशांची सोयच होणार नाही, तर सागरी पर्यटनालाही नवी दिशा मिळणार आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी एम२एम कंपनीच्या बोटीचे पहिले तिकीट बुक करून या सेवेचा शुभारंभ केला. कोकण किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू व्हावी यासाठी मंत्री राणे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते, ज्याला आता यश आले आहे.रोजी दुपारी १२ वाजता विजयदुर्गहून सुटणारी बोट सायंकाळी ७ वाजता मुंबईत दाखल होईल. मार्च महिन्यात या मार्गावर बोटीच्या एकूण १६ फेऱ्या नियोजित आहेत. मुंबई ते विजयदुर्ग या मार्गावर ४, ७, ११, १४, १८, २१, २५ मार्च रोजी बोटी धावतील, तर विजयदुर्ग ते मुंबई या मार्गावर ५, ८, १२, १५, १९, २२ आणि २६ मार्च रोजी बोट उपलब्ध असेल.



