
सावर्डे येथे २८ रोजी कोष्टी समाज प्रीमियर लीगचे आयोजन
आमदार शेखर निकम यांची प्रमुख उपस्थिती
आबलोली (संदेश कदम) : श्री देवांग कोष्टी समाज सेवा मंडळ रत्नागिरी आयोजित कोष्टी समाज प्रीमियर लीग २०२६ या जिल्हास्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी सह्याद्री क्रीडा संकुल सावर्डे येथे होणार आहेत.
या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सकाळी ९:३० वाजता चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर गोविंदराव निकम यांच्या हस्ते होणार असून या याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक सचिन पाकळे, श्री देवांग कोष्टी समाज महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत बाईत, उद्योजक विजय तेटांबे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धांचा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातील तमाम श्री देवांग कोष्टी समाज बांधवांनी आणि क्रिकेट प्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष गजानन लोकरे, कार्याध्यक्ष सचिन बाईत, सचिव अरविंद भंडारी, खजिनदार दीपक रेपाळ यांच्यासह सर्व कार्यकारणी सदस्यांनी, सल्लागार यांनी केले आहे.




