
सह्याद्री व्याघ्रमध्ये तिसर्या वाघीणीला यशस्वीरित्या निसर्गमुक्त करण्यात आले
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसर्या वाघिणीला (हिरकणी) शनिवारी यशस्वीरित्या निसर्गमुक्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोयना अभयारण्यात वाघ संवर्धनास मोठे बळ मिळाले असून कोयना अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले.
या वाघिणीसह गुरूवार, ५ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रातून पकडण्यात आली. ती त्यानंतर तिची वाहतूक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात करण्यात आली. पुढे बोटीने प्रवास करून शुक्रवारी रात्री वाघीण कोयना अभयारण्यात आणण्यात आली. आगमनानंतर पशुवैद्यकीय अधिकार्यांनी तिची सखोल तपासणी केली. तिला पाणी व मटण देण्यात आले असून ते तिथे व्यवस्थित स्वीकारले. त्यानंतर शनिवार ७ फेब्रुवारीला सकाळी ६ वाजता वाघिणीला कोयना अभयारण्यातील कोअर जंगल क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले.
www.konkantoday.com




