
संगमेश्वर पोलीस निरीक्षकांची बदली करा, ठाकरे सेना आक्रमक
संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील बॅनर वाद प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाला आता ठाकरे सेनेने आक्रमक वळण दिले आहे. संगमेश्वरचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची भूमिका या संपूर्ण वादात संशयास्पद असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्याविरूद्ध दोन दिवसात कारवाई न झाल्यास तालुक्यात सर्वपक्षीय बंद पुकारला जाईल आणि पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ मोर्चा काढला जाईल असा इशारा ठाकरे सेना तालुकाप्रमुख बंड्या बोरूकर, रोहित तांबे यांनी दिला आहे.
यासंदर्भात सोमवारी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेला माजी पालकमंत्री रविंद्र माने यांची देखील प्रमुख उपस्थितीहोती. पोलीस निरीक्षक उदय झावरे यांची तातडीने बदली करण्यात यावी आणि या प्रकरणाच्या निपक्षपाती चौकशीसाठी दुसर्या तपास अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात बोरूकर, तांबे यांनी केली आहे.
www.konkantoday.com



