संगमेश्वर तालुक्यात ग्रामीण क्रिकेट समितीची स्थापना

संघटित क्रिकेटकडे पहिले पाऊल

संगमेश्वर : तालुक्यातील क्रिकेट स्पर्धा अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक व सर्वमान्य पद्धतीने पार पाडण्यासाठी ‘ग्रामीण क्रिकेट समिती- संगमेश्वर तालुका’ची स्थापना करण्यात आली. २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत कार्यकारिणीची निवड बहुमताने करण्यात आली.
समितीची कार्यकारिणी अशी : अध्यक्ष- मारुती वाघमारे, उपाध्यक्ष- अमित जाधव, अभिराज नारकर, सुर्यकांत पांचाळ, सचिव- रणजित पवार, सहसचिव- मयुरेश यादव, स्वप्नील माईन, अमित तळेकर, खजिनदार- रोहित जाधव, सदस्य- शशिकांत गोरुले, आदित्य केळस्कर, योगेश चव्हाण, अनिकेत शिंदे, रितेश पांचाळ.
बैठकीत संघ नोंदणी शुल्क १ हजार रुपये निश्चित करण्यात आले. विभागनिहाय कार्यकारिणी व जबाबदाऱ्या निश्चित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच नगरपंचायत क्षेत्रातील संघांना वॉर्डनिहाय स्पर्धेत सहभागी करून घेण्याबाबतही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
यावेळी सचिव रणजीत पवार यांनी सांगितले की, “तालुक्यातील क्रिकेट अधिक संघटित, शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने पुढे नेणे हा समितीचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक खेळाडूला न्याय व संधी मिळावी, भविष्यात वाद टाळले जावेत आणि क्रिकेटला एक सकारात्मक दिशा मिळावी यासाठी समिती कटिबद्ध राहील.”
संगमेश्वर तालुक्यातील क्रिकेट आता एकजुटीने आणि नव्या उर्जेने पुढे जाणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button