संगमेश्वर तालुक्यातील कोंडये मधलीवाडी येथे एस.टी. बस व जेसीबी यांच्यात अपघात


संगमेश्वर तालुक्यातील कोंडये मधलीवाडी येथे एस.टी. बस व जेसीबी यांच्यात अपघात होऊन एस.टी. बसच्या समोरील भागाचे नुकसान झाले. या घटनेत बसमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसून मोठा अनर्थ टळला.

अकुंश रामचंद्र साळवे (हे दि. १६/०२/२०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वा. त्यांच्या ताब्यातील एस.टी. बस (क्र. एम.एच.१४/बीटी/२७२१) ही कोंड्ये ते संगमेश्वर मार्गावर प्रवासी घेऊन येत होते.

कोंडये मधलीवाडी येथे रस्त्याचे काम सुरू होते. जेसीबी (क्र. एम.एच.०८/बीई/७४७९) द्वारे रस्त्यावर टाकण्यात आलेल्या खडीचे समतलीकरण सुरू असताना एस.टी. बस सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या कडेला थांबविण्यात आली होती. मात्र, जेसीबी चालकाने मशीन मागे घेत असताना निष्काळजीपणाने एस.टी. बसच्या समोरील भागावर धडक दिली. त्यामुळे बसच्या पुढील भागाचे नुकसान झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button