संगणक परिचालक २४ फेब्रुवारीला विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन

रत्नागिरी : राज्यातील सुमारे २८, ५०० ग्रामपंचायत कार्यालयात मागील १४ वर्षांपासून कार्यरत असलेले २० हजार ग्रामपंचायत संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीने विधानभवनावर २४ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार असून या आंदोलनात हजारो संगणक परिचालक उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष घाग यांनी दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या संग्राम संगणकीकृत ग्रामीण महाराष्ट्र व आपले सरकार सेवा केंद्र या दोन प्रकल्पात वेगवेगळ्या कंपन्याच्या माध्यमातून मागील १४ वर्षांपासून राज्यातील सुमारे २८,५०० ग्रामपंचायत कार्यालयात २० हजार संगणक परिचालक अतिशय तुटपुंज्या मानधनावर ग्रामीण भागातील सुमारे ७ कोटी जनतेला विविध प्रकारच्या ऑनलाईन व ऑफलाईन सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे संगणक परिचालकांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतच्या सुधारित आकृतीबंधात ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी असून शासनाने अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देऊन
सुद्धा ही मागणी मान्य केली नाही. उलट संगणक परिचालकांला सध्या असलेले १० हजार रुपये मासिक मानधन प्रत्येक महिन्याच्या एका निश्चित तारखेला करण्याची हमी घेतलेली होती. महागाईच्या संगणक परिचालकांना त्यांच्यासह कुटुंबाचा गाडा चालवणे अवघड झाले आहे. शासनाने संगणक परिचालकांच्या काळात मागण्या मान्य करून न्याय द्यावा, ग्रामपंचायत संगणक परिचालकांना कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे, कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळण्यास वेळ लागत असेल तर सध्या असलेल्या १० हजार रुपये मानधनात शासनाच्या निधीतून ७ हजार रुपये वाढ करून संगणकपरिचालकांचे मासिक मानधन १७ हजार रुपये करणे, संगणक परिचालकांना ऑनलाईन कामकाज करण्यास अडथळा होत असल्याने राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला शासनाने नवीन संगणक, प्रिंटर व इत्तर आवश्यक साहित्य पुरवणे, सर्व संगणकपरिचालकांना किमान ५० लक्ष रुपयांचा अपघाती व आरोग्य विषयक विमा लागू करणे या मागण्यांसाठी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २४ फेब्रुवारी रोजी विधानभवनावर लक्षवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने दिलेल्या आश्वासनाकडे व संगणक परिचालकांच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यात येणार असून या आंदोलनात राज्यभरातून हजारो संगणक परिचालक आझाद मैदान, मुंबई येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष घाग यांनी दिली. त्यावेळी लांजा तालुका कार्यकारणी उपस्थित उपाध्यक्ष सौ. स्वरांजली पातेरे, सचिव दिलीप दाभोळकर, खजिनदार प्रशांत करंबेळे, कार्याध्यक्ष संतोष कांबळे, सदस्य किरण गुरव, मानसी डाफळे, अमोल जावडेकर, गीतानंद बोरकर, मंगेश कुळ्ये आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button