
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाजाला विविध समाजाच्या वतीने शुभेच्छा
श्री संत सेवालाल महाराज जयंती निमित्त बंजारा समाज रत्नागिरी येथे विविध समाजाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आली.
यावेळी त्वष्टा कासार ज्ञाती मंडळ रत्नागिरी चे अध्यक्ष अनिल पोटफोडे, भंडारी समाज चे अध्यक्ष श्री राजीव कीर, तेली समाजाच्या वतीने श्री प्रदीप दांडेकर , कटबु समाजाचे अध्यक्ष श्री बी टी मोरे , शिंपी समाजाच्या वतीने श्री दादा ढेकणे उपस्थित होते.
यावेळी बंजारा समाजाचे रत्नागिरीचे अध्यक्ष श्री अनंत राठोड , उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते . बंजारा समाजाच्या वतीने शाल देऊन आम्हा ज्ञाती बांधवांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी समाजाचे अध्यक्ष अनिल पोटफोडे यांनी समाजामधील सद्भाव वाढावा असा मूळ उद्देश्य असून इतर ज्ञाती मधील प्रमुख उपक्रमांना इतर ज्ञाती च्या सदस्यांनी जाऊन शुभेच्छा द्याव्यात आणि हिंदू समाज एक असून जरी जाती-जाती भिन्न असल्या तरी हिंदू म्हणून आपण सर्वांनी एक होणे गरजेचे आहे, ज्या ज्या वेळी हिंदू समाजाचे एकत्रिकरण असेल त्यावेळी सर्व समाजाने एक होणे गरजेचे आहे असे आपले संदेश असे आपल्या संदेशात सांगितले.




