
शिमग्याच्या पार्श्वभूमीवर घरगुती गॅसच्या सिलिंडरच्या तुटवड्यामुळे नागरिक हैराण
जिल्ह्यात सध्या शिममात्सवाचा सण पारंपरिक उत्साहात साजरा होत असतानाच घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोकणातील शिमगा म्हणजे पाहुण्यांची वर्दळ, नातेवाईकांची ये-जा आणि घराघरात बनणारे गोडधोड पदार्थ. मात्र याच काळाल गॅस मिळेनासा झाल्याने अनेक कुटुंबांचे नियोजन कोलमडले आहे.
मुंबई, पुणे आणि इतर शहरांतून हजारो चाकरमानी सणासाठी गावी दाखल झाले आहेत. त्यामुळे घरगुती गॅसचा वापर नेहमीपेक्षा लक्षणीय वाढला आहे. अनेक ग्राहकांनी पंधरा ते वीस पंचवीस दिवसांपूर्वीच सिलेंडर बुकिंग केले असूनही त्यांना अद्याप डिलिव्हरी मिळालेली नाही. गॅस एजन्सीकडे चौकशी केली असता ’पुरवठा कमी आहे’ असे उत्तर दिले जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे.
काही भागांत परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, नागरिकांना स्वतः गॅस गोदामांवर जाऊन चौकशी करावी लागत आहे. ’दररोज फोन करूनही ठोस उत्तर मिळत नाही, अशी नाराजी ग्राहक व्यक्त करत आहेत. ग्रामीण भामन चुलीचा पर्याय असल्याने काही प्रमाणात सोय होत असली तरी शहरातील कुटुंबांना मात्र गॅसअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.www.konkantoday.com




