शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी येथे हिंदोळा या भित्तीपत्रकाचे प्रकाशन


रत्नागिरी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी येथे हिंदोळा या भित्तीपत्रकाचे प्रकाशन सामाजिक कार्यकर्ते सुहासजी शितप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्री.सुहास शितप यांनी शिवाजी महाराज यांचे जीवनचरित्र अशाच छोट्या छोट्या उपक्रमातून अधिक दृढ होवून त्यातून त्यांना निश्चित अशी प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करत शाळेचा या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित “शिवप्रश्न मंजुषा ५०” हा कार्यक्रमही घेण्यात आला. दोन दिवस आधी छत्रपती महाराजांच्या जीवनावर आधारित १००प्रश्न दिले होते.विद्यार्थ्यांना राजगड,प्रतापगड,सिंहगड,पन्हाळगड,प्रचंडगड ५ गटात विभागून ५० प्रश्न विचारले गेले.सुरुवातीच्या पाच फे-यांवेळी साखळी पद्धतीने विचारले गेले.त्यानंतर बझर पद्धतीने प्रश्न विचारण्यात आले.त्यात सिंहगड गट विजेता तर उपविजेता पन्हाळगड गट ठरला.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रिया राणे आणि साक्षी शिवलकर, अन्वी घाणेकर,जान्हवी धावडे ,पायल घाणेकर,राजश्री करडे आदींची उपस्थिती होती.या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक श्री.राजेश पवार यांनी तर मार्गदर्शन मुख्याध्यापक श्रीम.अनुजा केळकर यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button