
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडळात थकबाकी ..
विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत १ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
यामध्ये रत्नागिरी परिमंडल अंतर्गत येणार्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील घरगुती १ लाख ४६ हजार २७७ग्राहकांकडे १४ कोटी ५१ लाख, व्यावसायिक १४ हजार ४०० ग्राहकांकडे ५ कोटी २५ लाख, औद्योगिक १ हजार ६३९ ग्राहकांकडे ३ कोटी २८ लाख, सार्वजनिक सेवा ५ हजार १५० ग्राहकांकडे २ कोटी ६० लाख आणि इतर वर्गवारीतील ३५ ग्राहकांकडे २७ लाख रुपयाच्या वीजबिलांची थकबाकी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात ४३ हजार ८४३ ग्राहकांकडे ०५ कोटी ८४ लाख, चिपळूण विभागात २४ हजार ६४८ ग्राहकांकडे ३ कोटी ३१ लाख, खेड विभागात २६ हजार ३७५ ग्राहकांकडे ०३ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील ७०८ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे.
www.konkantoday.com




