
विजयदुर्ग येथील आंबा व्यापारी यांच्या आंबा कलम बागेत चक्क रोप वेची निर्मिती
विजयदुर्ग येथील राजीव उर्फ चंदू वेलणकर यांच्या कलम बागेत सुनील पेठे यांनी खास आंबा फळासाठी रोपवे प्रकल्पाची निर्मिती केली आहे. चंदू वेलणकर यांची बाग ही उंचसखल जमिनीवर विस्तारलेली आहे. तेथे पेठे यांनी सुमारे १०० मीटर अंतरासाठी रोप वे प्रकल्प राबविला आहे. याबाबत माहिती देताना पेठे म्हणाले, या रोप वे प्रकल्पाच्या मध्यभागीही आंबा फळाच्या क्रेटची उचल घेण्यासाठी एक टप्पा ठेवण्यात आला आहे. रोप वेद्वारे वाहतूक वजन क्षमता सुमारे १०० किलो अथवा आंब्याने भरलेले चार क्रेट एवढी आहे. सखल भागातून आंबा क्रेट चढ भागातील आवश्यक ठिकाणी उतरविण्यासाठी या रोप वेद्वारे केवळ एका मिनिटांचा अवधी लागतो. उच सखल भागाच्या परिस्थितीनुसार हे वजन व वेळ कमी जास्त होवू शकतो. आंबा बागायतदार औषध फवारणीसाठी वापरत असलेल्या मशीनद्वारे रोप वे यंत्रणा कार्यान्वित होते. औषध फवारणी मशीनला पेट्रोलची आवश्यकता असते. परंतु हा रोप वे आपण मॅन्युअलीदेखील हाताळू शकतो. उंचसखल भागाशिवाय जमिनीच्या समांतर भागातही हा रोपवे प्रकल्प आपण राबवू शकतो. या प्रकल्यची अंतिम टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली असून हा प्रकल्प बागायतदारांना नव्या तंत्रज्ञानाशी ओळख करून देणारा ठरणारा आहे असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com




