विकसित भारताच व्हिजन साध्य करण्यासाठी स्पष्ट धोरण आणि तरतुदी असलेल रचनात्मक बजेट – दीपक पटवर्धन


७ नवे फ़ास्ट रेल्वे कॅरिडोर, नवी विश्वविद्यालये भारतात आणण्याची योजना, मेडिकल टुरिझम हब विकास, ५ वर्षात २० जलमार्ग विकसित करण्याची घोषणा,नारळ, काजू फलोत्पादनाला प्राधान्य देण्यासाठी विशेष योजना, एमएसएमई उद्योगसाठी १० हजार करोड,प्रत्येक जिल्यात मुलींसाठी एक हॉस्टेल, आरोग्य शिक्षण रोजगार या विषयांवर फोकस ठेवणार बजेट, आयटी , एआय या क्षेत्रा साठी विशेष प्राधान्य अशी अनेक फीचर असलेल हे रचनात्मक अंदाजपत्रक वित्तमंत्र्यांनी मांडले आहे.
२०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याच्या उद्दिष्टाला अग्रेसर करण्यासाठी आवश्यक रचनात्मक बदल सुकर करणार हे अंदाजपत्रक. शेती , शिक्षण,रोजगार आरोग्य या मानवसंसाधनाना बरोबर निगडित विषयावर विशेष लक्ष दिलेल हे बजेट आहे.
सेवा क्षेत्राच महत्व आणि संधी लक्षात घेऊन सेवा क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण करण्याच उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन उपयुक्त प्रावधान असलेल हे बजेट आहे. विकसित होणाऱ्या भारतात वाढती शहर लक्षात घेऊन अश्या शहरांसाठी प्रतिवर्षी १००० करोड खर्च करण्याची योजना असलेल हे अंदाजपत्रकआहे.
आयकर कायदे प्रक्रिया यामध्ये रिफॉरम करणारे हे बजेट आहे. उद्योग शेती बँकिंग तसंच सर्वसामान्य जनता या बजेट च स्वागत करेल अशी प्रतिक्रिया दीपक पटवर्धन यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button