लोटेतील पिफास विरोधी लढ्याच्या समर्थनार्थ इटलीतील आंदोलनकर्ते पाठिंबा देणार


रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत परिसरात पिफास या तथाकथित फॉरेव्हर केमिकलच्या उत्पादनाविरोधात सुरू असलेल्या धरणे आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची किनार लाभण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या समर्थनार्थ इटलीतील पिफास विरोधी आंदोलनकर्तेही पुढे येत असल्याची माहिती समोर आली आहे.
लोटे रासायनिक औद्योगिक वसाहतीत लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड या कंपनीमार्फत पिफास रसायने उत्पादन होत असल्याचा आरोप स्थानिक आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. पिफास ही पर्यावरणात दीर्घकाळ टीकणारी आणि मानवी आरोग्यास संभाव्यतः घातक ठरू शकणारी रसायने असल्याचा दावा पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्पादन तत्काळ थांबवण्याची मागणी केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button