
लांजा – राजापूरचेआमदार किरण सामंत यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला उत्स्फूर्तपणे सुरुवात झाली आहे. रत्नागिरीमध्ये 56 जिल्हा परिषद गट व 112 पंचायत समितीच्या गणासाठी हे मतदान होत आहे.लांजा – राजापूरचे
आमदार किरण सामंत यांनी सपत्नीक जिल्हा परिषद आदर्श विद्यामंदिर पाली १ या ठिकाणी बजावला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी वर्षा सामंत यादेखील उपस्थित होत्या. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे मतदानाचे प्रमाण लक्षणीय दिसून येत आहे




