लांजा तालुक्यातील शिपोशी बाईंगगाव परिसरात बिबट्याची दहशत


लांजा तालुक्यातील शिपोशी बाईंगगाव परिसरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू असून शनिवारी सायंकाळी या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थ व शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बाईंग गावात बिबट्याची दहशत झाली आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील शिपोशी बाईंग गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला असून पाळीव जनावरांवर वारंवार हल्ल्याच्या घटना घडत आहेत. काही शेतकर्‍यांच्या कोंबड्यांवर बिबट्याने हल्ले करून त्यांना फस्त केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. याआधीही बिबट्याच्या हल्ल्यात काही शेतकर्‍यांची गुरे मृत्युमुखी पडली आहेत.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास विशाल बाईंग यांनी आपली गुरे घराशेजारील रानात चरायला सोडली होती. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक गुरांवर हल्ला केला. या हल्ल्यात एका गाईचा जागीच मृत्यू झाला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button