लांजा तालुक्यातील ग्रामपंचायती मधील पोट निवडणूक लवकरच होणारं….

लांजा : तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीमधील रिक्त असलेल्या थेट सरपंच जागेसहित एकूण २३ ग्रामपंचायती सदस्य अशा एकूण २४ जागांसाठी लवकरच पोट निवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने राज्यातील ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या निधन, राजीनामा, अनहर्ता किंवा इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबवण्यात येणाऱ्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
लांजा तालुक्यात अशा प्रकारे एकूण १३ ग्रामपंचायतीमधील २४ पदे रिक्त आहेत यामध्ये एका थेट सरपंच पदासह उर्वरित २३ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. थेट सरपंच पदाचे १, अनुसूचित जातीची २, नामाप्र ७, सर्वसाधारण १४, आणि नामाप्र १ याप्रमाणे ही पदे रिक्त आहेत. भडे ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी राजीनामा दिल्यान हे पद रिक्त आहे. याच ग्रामपंचायतीमधील प्रभाग क्रमांक एक आणि तीन मधील एकूण ४ सदस्य पदे रिक्त आहेत. कुरचुंब ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक मधील २, वाघ्रट ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक मधील १, वेरळ ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक तीन मधील १, बेनी बुद्रुक ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक मधील १, शिरवली ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक व दोन तीन मधील ४, आगवे ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक मध्ये एक, खावडी प्रभाग क्रमांक एक मध्ये १, कोचरी प्रभाग क्रमांक एक आणि दोन मधील २, कोट
ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक मधील एक, पुनस ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक दोन मधील एक, कोर्ले ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक एक आणि तीन मधील २, आणि वेरवली खुर्द ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक दोन मधील १ अशी एकूण २४ पदे रिक्त आहेत.
या जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे यासाठी जाहीर करण्यात आल्या कार्यक्रमांतर्गत सोमवारी दिनांक १६ फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दिनांक १६ ते २० फेब्रुवारी पर्यंत त्यावर हरकती आणि सूचना दाखल करण्याचा असून दिनांक २४ फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button