
लांजा तालुक्यातील गोवीळ येथील रस्त्यावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने स्वार जखमी
लांजा तालुक्यातील गोवीळ येथील रस्त्यावर दुचाकीवरील ताबा सुटल्याने तरूण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. बाबूराम पांचू राजपूत (५८, रा. वैभव वसाहत, लांजा) असे जखमी स्वाराचे नाव आहे. बाबुराम नेहमी भंगार गोळा करून गोविळ येथून दुचाकी घेवून जात असताना त्याचा ताबा सुटल्याने अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या बाबुराम याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com



