
लांजा तालुक्यातील आरगावात आणि साखरपा परिसरात जोरदार अवकाळी पावसाची हजेरी;
सध्या थंडी गायब झाली असून मोठ्या प्रमाणावर उकाडा वाढला आहे हवामान खात्याने काही जिल्ह्यात पावसाचा इशारा दिला होता रत्नागिरी जिल्ह्यात आज शनिवारी दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होत अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. विशेषत: लांजा तालुक्यातील आरगावात आणि साखरपा परिसरात जोरदार सरी कोसळल्या
दुपारपर्यंत कडक ऊन असताना अचानक काळे ढग दाटून आले आणि वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वा-यासह पडलेल्या पावसामुळे फळबागाचे व काही घराचे नुकसान झाले आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तसेच कामावरून परतणाऱ्या कामगारांची धावपळ उडाली.
सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने ठिकठिकाणी मातीचे ढिगारे आणि खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागली.




